Tya Kovalya Phoolancha
त्या कोवळ्या फुलांचा
अनिल कांबळे यांचे गाण्याचे अर्थवाही बोल आणि श्रीधर फडकेंचा आर्त सूर -अप्रतिम संयोग.
खोकताना बाप मेला
माय आजारात गेली
घेऊनी देहास अपुल्या
लेक बाजारात गेली
त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी
गीतकार :अनिल कांबळे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके
Comments
Post a Comment