Posts

Showing posts from June, 2023

Majhya Saaranga, Raja Saaranga

Image
माज्या सारंगा, राजा सारंगा Lyrics : Shanta Shelke  Composer : Hrudaynath Mangeshkar Singer : Lata Mangeshkar   गाण्याची पार्श्वभूमी : कोळीवाड्यातली एक स्त्री जिच्यावर अकाली वैधव्य आलंय. नवरा गेल्याचं दुःख विसरून ती कामाला लागलीय. दहा वर्षांचा तिचा दीर आता कुटुंब प्रमुख झालाय. जबाबदारीच्या जाणिवेनं तो शिडाची बोट घेऊन समुद्रात मासेमारीला निघालाय. त्या लहानग्याला सोबत म्हणून ती  ही त्याच्या बरोबर गेलीय. अन पौर्णिमेची समुद्रात भरती आलीय. नंतर वादळ वारा ही सुटतो. ती दिराला समजावतेय की कोळीवाडा दूर राहिला, आता परत जाऊ या. "शिड फाटलं" चा संदर्भ हा श्लेष (pun in English) आहे. तो जसा वादळी वाऱ्यानं फाडलेल्या बोटीच्या शिडाशी आहे तसंच तिच्या उजाडलेला संसाराशी आहे - शिड फाटलं धावतं पाठी, तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी..  माज्या सारंगा, राजा सारंगा डोलकरा रं धाकल्या दीरा रं चल जावया घरा ! आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहिला दूर डोलां लोटिला पान्याचा पूर संबाल संसार सारा