Posts

Showing posts from February, 2024

Kuchh Na Kaho - in Marathi

Image
I have attempted to translate my earlier post in Marathi Here is the previous post - https://unmeshpatil.blogspot.com/2017/11/kuchh-na-kaho-kuchh-bhi-na-kaho.html So why am I translating it? No reason really. “कुछ ना कहो” हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी ते ऐकतो तेव्हा त्याची एक नवीनच बाजू समोर येते चित्रपट - 1942 A Love Story  या चित्रपटाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. हे गाणे मनीषा कोईराला (रज्जो, गरीब स्वातंत्र्यसैनिकाची लाजाळू मुलगी म्हणून) आणि अनिल कपूर (नरेन, ब्रिटिश समर्थक जमिनदाराचा उमदा स्टायलिश मुलगा) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. नरेनला रज्जो आवडली आहे आणि तो तिला आपलंसं करायच्या प्रयत्नात आहे.. तिला मात्र सामाजिक दबाव आणि त्यांच्या कुटुंबांमधील फूट याची जाणीव आहे. चित्रपटात हे गाणं रंगमंचावर एका नाटकाच्या सेटवर चित्रित करण्यात आले आहे. भानू दासगुप्ता यांचे Acoustic गिटार, रोनू मजुमदार यांचे बांबू बासरी, बीट्ससाठी हलकी तालवाद्ये, चेल्लो आणि Harmony व्हायोलिनची ही मुख्य वाद्ये आह