Kuchh Na Kaho - in Marathi

I have attempted to translate my earlier post in Marathi

Here is the previous post - https://unmeshpatil.blogspot.com/2017/11/kuchh-na-kaho-kuchh-bhi-na-kaho.html

So why am I translating it? No reason really.

“कुछ ना कहो” हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी ते ऐकतो तेव्हा त्याची एक नवीनच बाजू समोर येते

चित्रपट - 1942 A Love Story 


या चित्रपटाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. हे गाणे मनीषा कोईराला (रज्जो, गरीब स्वातंत्र्यसैनिकाची लाजाळू मुलगी म्हणून) आणि अनिल कपूर (नरेन, ब्रिटिश समर्थक जमिनदाराचा उमदा स्टायलिश मुलगा) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. नरेनला रज्जो आवडली आहे आणि तो तिला आपलंसं करायच्या प्रयत्नात आहे.. तिला मात्र सामाजिक दबाव आणि त्यांच्या कुटुंबांमधील फूट याची जाणीव आहे. चित्रपटात हे गाणं रंगमंचावर एका नाटकाच्या सेटवर चित्रित करण्यात आले आहे.

भानू दासगुप्ता यांचे Acoustic गिटार, रोनू मजुमदार यांचे बांबू बासरी, बीट्ससाठी हलकी तालवाद्ये, चेल्लो आणि Harmony व्हायोलिनची ही मुख्य वाद्ये आहेत.

ह्या गाण्यात व्हायोलिन्स आणि कुमार सानू यांचे जणू द्वंद्वगी आहे. कुमार सानूच्या प्रत्येक expression ला व्हायोलिन्स complement करतात. सानूने खूप छान गायले आहे पण हे गाणे गाण्यासाठी किशोर कुमार हवा होता अशी माझी इच्छा आहे. किंवा कदाचित अमित कुमार. सोनू निगम वापरला असता तर कदाचित काही उच्च Notes ही मिळाल्या असत्या!
 
काही काळापूर्वी गीतकार जावेद अख्तर यांनी या गाण्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ते म्हणाले की हे गाणे प्रथम लिहिले आणि नंतर आरडी बर्मन यांनी स्वरबद्ध केले. ते म्हणाले होते, त्यांच्या मूळ गाण्याचा फॉर्म general बॉलीवूड गाण्यांचा असतो तसा होता - चार ओळींचा मुखडा, मग कडवं . ... original गाण्यात फक्त या ओळी होत्या - कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है तुमको पता है, समय का ये पल थम सा हो गया है - अशा संवादाप्रमाणे होत्या
 
आरडीने जेव्हा चाल बांधली, जेव्हा जावेद अख्तर म्हणाले, "ह्या गीताच्या ओळी गद्य पद्य वाटतायत . ते एका संवादासारखे आहेत आणि समेपाशी येत नाहीयेत". त्यांनी मग पहिल्या चार ओळींना दोन ओळी जोडल्या  " और इस पल में कोई नहीं, बस एक मैं, बस एक तुम हो ". आरडी इतका प्रतिभाशाली होता, त्याने नव्याने जोडलेल्या ओळींनाही मूळ चालीत बसवले!
 
 
(थोडं विषयांतर ... जावेद अख्तरनी सांगितलेला किस्सा - त्यांना "सागर" चित्रपटासाठी टायटल सॉन्ग लिहायला सांगितले होतं . मात्र चित्रपटाची कथा ऐकून त्यांनी ठरवलं होतं की "सागर जैसी आखोंवाली" हे शब्द वापरून एक गाणं करायचं . त्यांनी त्यांच्या मनानं ते गाणं लिहलं. जेव्हा ते दिग्दर्शकाच्या (रमेश सिप्पी) बैंठकीला गेले, तेव्हा त्यांनी घोषित केलं की तुम्ही सांगितलेल्या situation वर गाणं लिहिलं नाहीये. हे सांगताच सर्व उपस्थित अस्वस्थ झाले. मात्र त्यांनी लगेच सांगितलं की मी दुसरं एक गाणं लिहिलं आहे जे मला ह्या चित्रपटासाठी योग्य वाटतंय . ते गाणं होतं "चेहरा है या चाँद खिला है". रमेश सिप्पीनी होकार देताच RD बाजूच्या खोलीत गेला आणि त्याने पाच मिनिटात चाल तयार केली. ही तीच चाल आहे जी आपण सर्व जाणतो. जावेद अख्तरनी नंतर जे मूळ अपेक्षित गाणं होतं ते लिहिलं . ते होतं "सागर किनारे दिल ये पुकारे".
 
असो! परत मूळ विषयाकडे येतो  - गाण्याची सुरुवात रज्जो नरेनला चिडवण्यापासून होते. तिच्या गळ्यातले मोती त्यांच्या खेळकर झटापटीत तुटतात आणि विखरून जातात. नाराज झालेल्या रज्जोला समजावताना नरेन गाणं सुरु करतो “कुछ ना कहो”
 
कीबोर्डवरील नोट्ससह गिटारवरील स्ट्रमसह (Strum) संगीत सुरू होते. नरेन रज्जोला जवळ ओढत असताना, बासरी रोंगीलो रोंगीलो मोडमध्ये जाते. (योगायोगाने, हे रोंगीलो गाणे एस.डी. बर्मन यांनी गायले होते आणि जसीमुद्दीन यांनी संगीतबद्ध केले होते. एसडीने नंतर गीता दत्तच्या आवाजात "देवदास" चित्रपटात "आन मिलो आन मिलो" म्हणून वापरले..... Sorry, परत विषयांतर झालं, तो सम्पूर्ण किस्सा नंतर कधी तरी!
 
बारकाईने ऐका आणि तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीच्या ओळीतील “कुछ ना कहो” ह्या तीन शब्दांची चाल हृषिकेश मुखर्जीच्या “खुबसूरत” मधील “कायदा तोड के ” सारखे आहेत जे पूर्णपणे वेगळ्या मूडमध्ये आणि वेगळ्या संगीताच्या मांडणीत आहेत. "पुछो ना यार क्या हुआ" (जमाने को दिखना है) मधील "दिल पे था हमें, कितना एतबार" हे दुसरे उदाहरण. त्या शब्दांची ही चाल तशीच आहे! पण एकदा आपण त्या तीन सुरुवातीच्या शब्दांच्या पुढे गेलो की, गाण्याचं स्वतः:चं अस्तित्व सुरु होतं. पूर्णपणे नवीन गाणे तयार करण्यासाठी आरडी अनेकदा त्यांच्या स्वत: च्या गाण्यांमधून किंवा सचिन देव बर्मन यांनी संगीत दिलेल्या अशा शब्द समूहांचा वापर करायचे.
 
या चित्रपटातील आणखी एक उदाहरण म्हणजे कविता कृष्णमूर्तीचा "क्यू नये लग रहे हैं ये .." ज्यात "हीरा पन्ना" मधील " हीरा तो पहले ही किसी .." शी साम्य आहे .  तसेच "आप की कसम" मधील " चोरी चोरी चुपके चुपके ". आशा भोसले यांच्या आवाजात ऐसा क्यू होता है साठी हीच संगीताच्या मांडणी अप्रकाशित "अमीर आदमी गरीब आदमी" साठी वापरण्यात आला होता . हे म्हणजे जसा एक मास्टर शेफ एकाच प्रकारचे पदार्थ घेऊन वेगवेगळ्या Dishes तयार करतो तसं आहे. ह्याला "कॉपी" म्हणून त्याची हेटाळणी करणं हे वैचारिक सांगीतिक अपरिपक्वतेचं लक्षण आहे.

Sorry, परत विषयांतर झालं. ह्या चित्रपटात म्हणे मुख्य कलाकार म्हणून माधुरी दीक्षित आणि अमीर खान हे पहिल्या पसंतीचे होते, पण उपलब्धतेच्या समस्येमुळे मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना साइन करण्यात आले. "एक लडकी को देखा" हे गाणे माधुरीला लीड भूमिकेत समजून लिहिले होते असे म्हटले जाते.

आता इतके विषयांतर झालंच आहे तर आणखी थोडं  - हे गाणे फराह खानने कोरिओग्राफ केले आहे आणि संजय लीला भन्साळी यांनी चित्रित केले आहे! त्या काळात तो विधू विनोद चोप्राला असिस्ट करत होता.
 
काही संगीत प्रेमींचे असे मत आहे की कुछ ना कहोचे बीट्स (ठेका/ताल) दादरा आहे. माझं मत आहे की दादरा पेक्षा बीट्स जास्त वॉटल्झ वाटताहेत. वॉल्ट्ज म्हणजे काय? वॉल्ट्झ हे पार्टी सेटअपचे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि धिन चक चक, धिन चक चक, धिन चक चक असे काहीतरी आहे. या पॅटर्नला 3/4 पॅटर्न असेही म्हणतात. 
वॉल्ट्झ समजून घेण्यासाठी येथे काही उदाहरणे आहेत -  
जीना यह मरना - मेरा नाम जोकर 
जीना यह (चक चक) मारना (चक चक) - मेरा नाम जोकर 
 
दिल की गिरह खोल दो चुप ना बैठो - रात और दिन 
दिल की (चक चक) गिरह खोल (चक चक) दो चूप (चक चक) ना बैठो (चक चक)
 
दोस्त दोस्त ना राहा - संगम
दिल की नजर से - अनादी
मैं शायर तो नहीं - बॉबी 
त्याचप्रमाणे आर.डी.चे काही स्वतःचे- 
जोशीला - किसका रास्ता देखा 
तेरा मुझे है पहले का नाता कोई 
तथापि, आरडी आरडी असल्याने त्याने वॉल्ट्झचा चा प्रचलित ठेका वापरला नाही. तो 6/8 पॅटर्नसाठी गेला आहे. खरं तर, ही गाणी वॉल्ट्झपेक्षा "म्युसेट" प्रकारात जास्त आहे. तथापि, "कुछ ना कहो" Classical वॉल्ट्ज पॅटर्न वापरतो. आता आरडी वॉल्ट्झसाठी का गेला असेल? नायक नरेन हा पाश्चिमात्य विचारांचा, श्रीमंत तरुण आहे. म्हणून जेव्हा तो आपल्या प्रेयसीशी प्रणय/नृत्य करण्याचा विचार करत असेल तेव्हा तो त्याच्या पाश्चात्य पद्धतीने विचार करेल. तिच्याबरोबर हॉलमध्ये नाचण्याची कल्पना करेल. बहुधा इथेच वॉल्ट्झ आला होता! संपूर्ण गाण्यात  background ला व्हायोलिन्स आहेत. ते ओळींनुसार स्वरांना पूरक आहेत. The composition is such that it is unhurried and takes its own time as it meanders along the flow. 

गाण्याकडे परतू, "कुछ ना" आणि "कुछ भी ना" नंतर एक क्षणिक pause आहे. तो कसा ते लक्षात घ्या. "समय का ये पल" नंतर असाच एक विराम आहे..... 'थम सा गया है'चा अग्रदूत म्हणून... आणि गंमत म्हणजे, कुमार सानू ने  ज्या प्रकारे "समय का ये पल" गायलं आहे , तो "पल" अनंतकाळपर्यंत पसरवतो. अगदी नायकाला हवा तसा. तो पल कधीच संपू नये आणि आपण दोघे त्या क्षणात कायमचे गोठले पाहिजे ... तो क्षण अनंतकाळासाठी असावा अशी त्याची इच्छा आहे. आता क्षण हा actually क्षणिक असतो. It's a moment. तो eternity पर्यंत खेचणे म्हणजे it becomes an oxymoron. You will see further that this song is a lesson in terms of figures of speech. पार्श्वसंगीतात ड्रमवरील थाप लयीत असते तर ताल बास गिटारवर असते. ड्रमची थाप हृदयाच्या ठोक्याची जागा घेते आणि बेस गिटार श्वास उच्छवासाची जागा घेते. जणू दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले आहेत की दोघांची हृदयं एकाच लयीत धड्धडतायत आणि श्वास एकमेकात मिसळून गेलेत  An amazing combination of music personating feelings!!
 
जावेद अख्तरचे गीत Simile ’s (म्हणजे गोष्टींची तुलना करणे उदा. बर्फासारख्या पांढऱ्या) आणि Metaphor (म्हणजे “like” हा शब्द न वापरता गोष्टींची तुलना करणे) यांनी खचाखच भरलेले आहे. Simile चा नमुना-
कितने गहरे हलके, शाम के रंग है छलके 
परबत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके

संध्याकाळच्या ढगां
चा पांढऱ्या डोंगर उतारावरून मावळत्या सूर्याच्या रंगांनी चमकणाऱ्या ढगांची प्रेयसीच्या अंगा खांद्यावरून घसरणाऱ्या दुपट्ट्याशी केलेली तुलना केवळ अप्रतिम. Here is the Simile!

किंवा सुलगी सुलगी साँसें मधील Metaphor आणि Repetition
, बहकी बहकी धड़कन 
महके महके शाम के साए, पिघले पिघले तन मन

संध्याकाळच्या सावल्यांना सुगंधित फुलांचे रूप देणे आणि पिघले पिघले तन मन मधील रूपकाकडे परत येणे. उत्कृष्ट!!
 
Link to the song
https://youtu.be/hH79321JJQ0

Rhyme scheme (Google translation - यमक योजना) ABBCCCDA Weird, unique .... its open for interpretation!

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो  
क्या कहना है, क्या सुनना है 
मुझको पता है, तुमको पता है 
समय का ये पल थम सा गया है 
और इस पल में कोई नहीं है 
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
 

M1 वर येत आहे किंवा पहिले इंटरल्यूड संगीत. हा ट्रेडमार्क RD आहे ज्यामध्ये बासरीवर अगदी लहान इंटरल्यूड आहे (... तुम्ही बरोबर अंदाज केलात.... रोंगीलो)

 किती गहरे हलके, शाम के रंग है छल्के 

परबत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके 
और इस पल में... 

 आता एम२. संपूर्ण इंटरल्यूड संगीत व्हायोलिनवरील एका अद्भुत सिम्फनीचा भाग असू शकते. जणू भरती आणि ओहोटीच्या लाटांचा आलटून पालटून खेळ सुरु आहे, आणि नंतर फक्त उच्च नोट्समध्ये जाण्यासाठी तान घेते.  व्हायोलिनच्या उच्च Notes ना चेल्लोचा खर्ज एक परिपूर्ण balance प्रदान करते. 

M2 एकट्याने वाजवलेल्या व्हायोलिनच्या तुकड्याने संपतो .  

सुलगी सुलगी साँसें, बहकी बहकी धड़कन 

महके महके शाम के साए, पिघले पिघले तन मन 
और इस पल में... 
 

सहसा गाणे मुख्य कलाकाराने सुरुवातीच्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणत संपते. येथे मात्र फक्त व्हायोलिनसह गाणे क्लायमॅक्स वर थांबतं. 

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

Trip to Karde