Meaning of Sukh-karta Dukh-harta

गणपती आरती

I had been singing this aarti since childhood but I never bothered to find out what it meant! Now maybe the shades of grey behind the ears compelled me to find out what it meant. Here is an interpretation of what I have learnt from others about this aarti. I am open for suggestions or corrections. I tried to use the right Marathi letters but could not find the exact matches for a few. In that context there may be some spelling mistakes.

गणपती आरतीसमर्थ रामदास स्वामी

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

(श्री गणेशा तू सुखाचा कर्ता आणि द:खाचे हरण करणारा आहेस

वार्ता विघ्नाची नुरवी = विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवित नाही)

नुरवी पुरवी प्रेम क्रुपा जयाची

(त्याची क्रुपा फक्त प्रेमच पुरवते)

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

(ज्याच्या सर्वांगावर शेंदुरची उटी [उटणं?] आहे)

कंठी झळके माळ मुक्ताफळांची

(ज्याच्या गळ्यात मोत्यांची माळ झळकते आहे)

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रें मन:कामना पूर्ती

(ज्याच्या मात्र (फक्त) दर्शनाने मनोकामना पूर्ण होते)

जयदेव जयदेव

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा

(गौरीच्या पुत्रा तुझ्यासाठी रत्नांनी सजवलेले आसन)

चंदनाची उटी कुमकुम केशरा

(तुझ्यासाठी चंदनाचे उटणं, भाळी केशराचे गंध)

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

(तुझा हिरयांनी सजवलेला मुकुट शोभून दिसतोय)

रुणझुणती नुपूरें चरणी घागरिया

(ज्याच्या पायातील दागिन्यातील घुंगरू वाजतात)

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रें मन:कामना पूर्ती

जयदेव जयदेव

लंबोदर पितांबर फणीवर बंधना

(लंबोदर पितांबर = अनेकांचे अपराध पोटात घातल्यामुळे मोठे पोट असलेला, पितांबर नेसलेला

फणीवर बंधना = कमरेला साप बांधलेला आहे)

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

(वक्रतुंड = ’वक्रान तुंडय़ति असौ वक्रतुंडम्हणजेच जे वक्र अर्थात दुष्ट असतात, त्यांचा संहार करणारा

त्रिनयना = शंकरा प्रमाणेच गणपतीलाही तीन नेत्र आहेत, मात्र गणपतीचा तिसरा डोळा म्हणजे न्यान [knowledge] असं समजलं जातं)

दास रामाचा वाट पाहे सदना

(रामाचा दास अर्थात रामदास, गणपती त्यांच्या घरी येण्याची वाट पहात आहेत)

संकटी पावावे निर्वाणी रक्शावे सुरवरवंदना

(संकटकाळी त्याने दर्शन देऊन रक्शण करावे)

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रें मन:कामना पूर्ती

जयदेव जयदेव

Comments

 1. Very helpful Sir. Thank you for posting this. Visharad Malodkar

  ReplyDelete
 2. khup chan....
  anand jhala wachun... :-)

  ReplyDelete
 3. Thanks...your efforts are worthful

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Difference between snow, sleet, hail, rain, frost and dew

Pancham-Bengali Non Filmy to Hindi

Pancham's Unreleased Songs