Irony that is India - 3

गंम्मत आहे ....
१२ – १२ तास वीज गायब तरी बिल मात्रं भरमसाठ
भेसळीचे महाग पेट्रोल घ्यायचे, शिवाय PUC पण द्यायचे!
रस्त्यावर वाहतुकीची बोंब तरीही रोड tax द्यायचा
परिसर अस्वच्छ तरीही property tax द्यायचा

गंम्मत आहे ....
पैशासाठी भिकारीण मुलाला चौकात नाचवते
पैशासाठी उच्चभ्रू आई मुलाला राखीच्या शो मधे भाड्याने देते
खाजगीत पापं करणारे पांढरे शुभ्र कपडे घालतात
आणि जगाला नैतीकतेचे पाठ देतात

गंम्मत आहे ....
चंद्र ही भासावा स्वस्त असा भाव सोन्याचा होई
एक किलोच्या भावात अर्धा किलो साखर येई
राजकारण्यांना निवडणूकीच्या धांदलीत वेळ नाही
तरीही देशातील जनतेला दिवाळीची घाई

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

One song inspires many more