मराठी कविता
काही उत्तम मराठी कविता
सुधीर मोघेन्हाउनिया उभी मी सुकवीत केस ओले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले
अवकाश भारलेला, माझे मला न भान
अनिवार एक होती, ओठावरी तहान
खासाचिया लयीत संगीत पेरलेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले
साधून हीच वेळ आला कोठून वारा
सुखवीत फूल त्याने लुटला पराग सारा
मग होई चंदनाचे अस्तित्व तापलेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले
दाही दिशात तेव्हा आली भरूनी तृप्ति
अंगांग तेवणारी होई निवांत ज्योति
येई न सांगता जे असे घडून गेले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले
Comments
Post a Comment