Khali Haath Shaam Aayi Hai - 2

 खाली हाथ शाम आयी है

मराठीत ब्लॉग लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूक भूल देणे घेणे.

 1980 च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतातल्या सो कॉल्ड जाणकारांनी घोषित करून टाकलं होतं की आरडी बर्मन संपला. त्याच्या कडे जेवढं संगीत होतं ते देऊन झालंय आणि आता त्याच्या संगीतात काही दम नाही. वास्तविक ह्या दशकातही त्याचे संगीत उत्तम होते. उदा. सागर, लिबास, अलग अलग , मासूम , परिंदा , अगर तूम न होते , इजाज़त… ज्या संगीताला अयशस्वी असा शिक्का मारला गेला त्याच गाण्यांना आज क्लासिक म्हणून ओळखले जातंय. असो! कालाय तस्मै नमः

 खाली हाथ शाम आयी है – १९८७ मध्ये आलेल्या इजाज़त मधील चारही असामान्य गाण्यांमधले एक सुपर असामान्य गाणे. गुलज़ारची एक सहा ओळींची कविता, त्याला आशाच्या आवाजात आरडी ची चाल. एखाद्या संध्याकाळी जेव्हा एकटे असाल तेव्हा कानाला हेडफोन लावून किंवा music system मध्ये बेस आणि treble ची योग्य लेव्हल adjust करून ऐकण्यासारखे गाणे.

 गाणं ऐकताना शास्त्रीय संगीतावर असलेली आरडीची हुकमत आणि समज परत एकदा समोर येते. एसडी बर्मनच्या मूळ चालीला आरडी ने  राग पिलू मध्ये अशा तऱ्हेने फुलवलेय की तो स्वर्गस्थ पिता ही धन्य झाला असेल. 

आता थोडे विषयांतर करतो. एस डी बर्मनच्या ह्या गाण्याचा एक किस्सा सांगितलं जातो. हे गाणं १९४० सालच आहे. तेव्हा कुंदन लाल सैगल (K L Saigal) संगीतात टॉप वर होते. एका कार्यक्रमात ते आणि एस.डी दोघांनाही परफॉर्म करायचे होते. कार्यक्रम पत्रिकेनुसार आधी सैगल मग एस.डी. लोकाग्रहास्तव सैगल यांनी जास्त गाणी गायल्यामुळे त्यांना तिथून निघायला उशीर झाला. ते घाईत निघाले. कार्यक्र्म स्थळाच्या फाटकापाशी असताना एस.डी नी "आमी छिन्नू एका" गायला सुरु केले. हे गीत तेव्हा रेकॉर्ड वर प्रकाशित झाले नव्हते.  

स्तब्ध होऊन ते ऐकत राहिले. हे तर त्यांचेच गीत होते! एस.डी नी सैगलची ठुमरी "कौन बुझावे तपत मन की" ला totally transform केले होते. त्या गायनातील एकटेपणाचा भाव सैगलना मुकं करून गेला. त्यातील करूण स्वर प्रेषकांना भावून गेले. गाणे संपताच टाळ्यांनी सभागृह भरून गेले. सैगलही भारावून गेले होते. नंतर हे गाणे रीतसर प्रकाशित झाले. (Source: ‘S.D. Burman – The World of His Music’, biography by Khagesh Dev Burman).

असो. परत मूळ विषयावर येतो. “अमी चिन्नू एक बाशोर जागेच्या ओपनिंग लाइनचा first bar घेत हे गाणे सुरु होतं. By the way S D चे आणखी एक जुने गाणे आहे - तेरे बिन सूने नैन हमारे (चित्रपट : मेरी सूरत तेरी आँखे ) - ह्याची आणि RD चे "अनामिका" तील "जाऊ तो कहां जाऊ, सब कुछ यही है " opening चाल ही ditto "खाली हाथ शाम आई है " सारखी आहे


  हे गाणं रेखावर म्हणजे सुधा वर चित्रीत आहे. बॅकग्राऊंड अशी आहे की ती महेंद्रचे (नासिरुद्दीन) घर सोडून आलीय. महेंद्र त्याच्या भूतकाळातील मैत्रीण मायाला विसरू शकत नाहीय. त्या घरात माया पूर्वी रहात असल्यामुळे तिचे अस्तित्व तिथल्या प्रत्येक गोष्टीवर आहे. सुधाला सतत ही भावना असते की माया माझ्या संसारात डोकावतेय. त्याला कंटाळून सुधा शेवटी महेंद्रचे घर सोडून जाते. तिला हे समजत असतं की तो मायाला विसरण्याचे प्रयत्न करतोय. मात्र त्याचे घर सोडल्याची, त्याला एकटं सोडल्याची अपराधी भावना, ह्यांनी तिच्या आयुष्यात आलेले रितेपण आणि वैफल्य ही ह्या गाण्याची पार्शवभूमी .

 एकट्या असलेल्या व्यक्तीला संध्याकाळ कशी निराशाजनक वाटते हे गुलझार ने असे सांगितले आहे –

"रात और दिन कितने खूबसूरत दो वक़्त हैं, और कितने खूबसूरत दो लफ्ज़। इन दो लफ़्ज़ों के बीच में, एक वक़फ़ा आता है, जिसे शाम का वक़्त कहते हैं। ये वो वक़्त है, जिसे न रात अपनाती है, न दिन अपने साथ लेकर जाता है। इस छोड़े हुए, या छूटे हुए लावारिस वक़्त से, शायर अक्सर कोई न कोई लम्हा चुन लेता है, और सी लेता है अपने शेरों में। लेकिन कोई-कोई शाम भी ऐसी बाँझ होती है, के कोई लम्हा देकर नहीं जाती।"

 ह्या गाण्याचं कंपोझिशन इतकं सुरेख आहे की उत्तम संगीत करायच असेल आणि मेलडी असेल तर त्यासाठी खूप मोट्या वाद्यवृंदाची गरज नाहीये. ह्या गाण्यात मुख्य सांगीतिक कॅरेक्टर्स आहेत आशाताईंचा आवाज आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी पंडित रोणू मजुमदारांची बासरी. जणू काही जुगलबंदीच.आणि या जुगलबंदीला साथ दिली आहे ते गिटार, बेस गिटार, तबला, संतूर, वीणा आणि सितार यांनी. बस हीच मेजर वाद्य या गाण्यात आहेत. आपल्याकडे पूर्वी मोजकी वाद्य घेऊन भावगीतं असत, हे गाणं ही तसंच मोजकी वाद्ये घेऊन गुंफले आहे


  पुढे लिंक दिली आहे . सुरवातीला आरडी च्या आवाजात दोन मिनिटांचे making of the song मग मुख्य गाणं. गाणे लावा आणि डोळे बंद करून ऐकत चला किंवा read on

https://www.youtube.com/watch?v=hEaKBRJkkn0

 

 हे गाणे शास्त्रीय शैलीत वीणेवर सुरु होतं त्यानंतर संतूरवर तरंग, साथीला गिटार आणि तबला. हे गाणे वाजत असताना, गाण्याच्या प्रत्येक ओळीत बासरी आशाला कशी साथ देते ते लक्षात घ्या.

 खाली हाथ शाम आयी है, खाली हाथ जायेगी

आज भी ना आया कोई, खाली लौट जायेगी

 Empty handed has the evening come, empty it will depart

My muse eludes me once again, Empty shall be my heart

 पहिल्या अंतराचा संगीतात जिथे आशाताईंचा स्वर संपतात, तिथून बासरी सुरू होते आणि बासरी अशीच वळणं वळणं घेत राहते आशाताईंचा स्वर सुरु होईपर्यंत. आरडीच्या संगीतात usually पहिला अत्र्यांचं संगीत छोटं असत. मात्र इथे बासरीचा elaborate piece आहे. बासरीला साथ आहे तबला, गिटारआणि Resso ची.

 आज भी ना आये आँसू, आज भी ना भीगे नैना

आज भी ये कोरी रैना, कोरी लौट जायेगी

 Tears do not well up today as well, My eyes are moist no more,

Once again the long, blank night, Will return as before

 दुसऱ्या अंतऱ्यात मेजर आहे सितार आणि साथीला आहेत तबला आणि संतूर. सितारीचे स्वर शार्प आहेत

 रात की सियाही कोई, आये तो मिटाये ना

आज ना मिटायी तो ये, कल भी लौट आयेगी

 The night is stained dark, as I wait for that someone

Stained it will be tomorrow as well, if not effaced by the loved one

 गाणं संपता संपता परत बासरीचे स्वर येतात. संतूरच्या positive स्वरांना बासरी दोन वेळा साथ देते खरी पण दिवा मालवल्या सारखे विझवून जाते

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

One song inspires many more