Bhijalele Kshan

भिजलेले क्षण

ते क्षण भिजलेले
थोडे तुझ्यातले
थोडे माझ्यातले

चोरट्या स्पर्शातले
कधी हातातले
कधी ओठातले

अबोल एकांतातले
कधी मिठीतले
कधी रुसव्यातले

ते क्षण मनातले
मनाच्या कोपऱ्यातले
फक्त .... आपल्या  दोघांतले 

Comments