Dombivli Fast Monologue

An excellent monologue from Madhav Apte who is anguished by the corruption and decrease in human values.

माती त्यावर शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढायची. चित्र असं होतं. मग तिथे डांबर टाकून सूरू झाले हे सर्व. हव्यास ... हव्यास जडला सर्वांना अधिक जास्तीचा हव्यास. आंगण वावर पूरेना. मग नोकरी धंदे सूरू झाले. नोकरीत पगार पूरेना धंद्यात नफ़ा पूरेना. मग तो मिळवणं सूरू झालं. पगारवाढीसाठी संप .... दमदाट्या .... मोर्चे. नफ़ा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरिमिरी, चोरी ... शेवाळं वाढतच गेलं. दलदलीत फसत गेलं सालं. छान लिहायचो चित्र काढायचो पण मग पैसे हवेत. स्थिरता म्हणून बॅंकेत. B.Com पर्यन्त एवढा शिकलो एवढं वाचलं, पण पुढे काय तर Ledger भरा परिपत्रके लिहा. जेवढा न्हायलो आधी तेवढाच कोरडा होत गेलो. थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा. एका रेशेत उभे रहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मूलं जन्माला घाला. एकेक करून अनेक गोष्टी करा आणि एकदा मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं एकटं जायचं आणि मधे हा साला जीवघेणा प्रवास. साला. अरे मग हा साला प्रवास सरळ नको का? आपल्या मनासारखा नको का? अरे ठरवलेलं ना सर्वांनी की नियम करायचे नियम पाळायचे मग मोडायची घाई का? सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं? ठरवा शिस्तं नको मग व्हा बेशिस्त व्हा. लाज सोडायची तर मग सगळ्यानी सोडा एकट्यानीच कशाला? एकट्यालाच कशाला ते ओझं?

जगू आणि जगू द्या हा नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा की मारू आणि मरू या. सगळ्यांना मरू. संपवून टाकू हे सगळं. आणि सांगू त्या विधात्याला नाही नाही आवडला तुझा खेळ नाही आवडला तुझा खेळ.

I the undersigned Madhav Apte making this declaration that due to my own philosophy I am not eligible to live on this planet. So please take away my services and I don’t expect any payments for this. I don’t. …. Infact would like to give all dues on my account if any. So please Lord, God I am enclosing my body with my soul in that with this declaration so please accept this and relieve me at the earliest. Please ….


हा चित्रपट आपल्याला प्रचंड अस्वस्थ करतो. गोष्टी रोजच्याच आहेत – शाळेच्या admission ची donation, दुकानदाराने वस्तू MRP ला न विकणे, पाण्याच्या tanker वाल्याची अरेरावी – ह्याच गोष्टी आपण अनुभवत असतो. हा चित्रपट थोडासा Michael Douglas च्या Falling Down सारखा आहे. The high spot of the movie is the monologue stated above and the last sentence that Madhav Apte says to the police inspector,” आयुष्य गेलं चवथ्या सीट्वर बसून. जरा खिडकीत बसू?”

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

One song inspires many more