Athavani

आपण कळत नकळत आठवणीत जगत असतो
सोईप्रमाणे त्याना गोंजारत असतो
गोड आठवण आली की खुदकन हसायचे
कडू असेल तर ओठ दाबायचे
अशा आठवणींच्या खजिन्यातील रंग घेउन
वर्तमानाचे चित्र रंगवीत असतो

---------------------------------------------------------

वारा असा बेभान झाला
झाडांना विस्कटून गेला
हताश झाला आसमंत
जणू आभाळ ओरबडून गेला
मग पाऊस ही आला
कधी अश्रुंचा
आठवणींच्या गर्दीचा
थीजलेल्या भावनांचा
पसारा
ठेऊन गेला
---------------------------------------------------------
थोड्याशा उदास
थोड्या नि:शब्द
थोड्या असहाय्य
माझ्या हातावरल्या रेषा
ह्याच रेशांमधे असेल का
तीचीही एक रेषा?


Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

Trip to Karde