Posts

Showing posts from September, 2024

Sunya Sunya Maifileet Majhya

उंबरठा सिनेमा मला वाटतं 1980 च्या आसपास रिलीज झाला होता. जब्बार पटेल दिग्दर्शित हा सिनेमा त्यावेळेस मला कंटाळवाना वाटला होता . अश्या कथेचा सिनेमा समजायचं ते वय ही नव्हतं . नंतर बराच काळ गेला आणि हा सिनेमा काय आहे ते समजलं आणि त्यामुळे तो सिनेमा परत परत बघितला गेला. “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” हे गीत सुरेश भटांनी लिहिलं होतं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलं होतं.मुख्य व्यक्तिरेखा आहे सुलभा महाजन ची जी साकारली स्मिता पाटील ने. सामाजिक जाणिवा, नैतिक मूल्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्यात होणारा राजकीय हस्तक्षेप यशा कात्रीत सापडलेल्या महिलेची ही कथा.                         ती महिलांच्या तुरुंगाची वॉर्डन असते . आपले कर्तव्य पार पाडायचे म्हणून तिने जाणून बुजून हे क्षेत्र निवडलं असतं. त्यासाठी तिला घर सोडावं लागतं. ती कामाला वाहून घेते, मात्र हे करताना नेत्यांकडून, प्रतिष्ठितांकडून घेतला जाणारा गैरफायदा वगैरे पाहून सगळं काही सोडून संसारात परत यायचा निर्णय घेते....