Khali Haath Shaam Aayi Hai - 2
खाली हाथ शाम आयी है मराठीत ब्लॉग लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूक भूल देणे घेणे. 1980 च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतातल्या सो कॉल्ड जाणकारांनी घोषित करून टाकलं होतं की आरडी बर्मन संपला. त्याच्या कडे जेवढं संगीत होतं ते देऊन झालंय आणि आता त्याच्या संगीतात काही दम नाही. वास्तविक ह्या दशकातही त्याचे संगीत उत्तम होते. उदा. सागर, लिबास, अलग अलग , मासूम , परिंदा , अगर तूम न होते , इजाज़त … ज्या संगीताला अयशस्वी असा शिक्का मारला गेला त्याच गाण्यांना आज क्लासिक म्हणून ओळखले जातंय. असो! कालाय तस्मै नमः खाली हाथ शाम आयी है – १९८७ मध्ये आलेल्या इजाज़त मधील चारही असामान्य गाण्यां मधले एक सुपर असामान्य गाणे. गुलज़ारची एक सहा ओळींची कविता, त्याला आशाच्या आवाजात आरडी ची चाल. एखाद्या संध्याकाळी जेव्हा एकटे असाल तेव्हा कानाला हेडफोन लावून किंवा music system मध्ये बेस आणि treble ची योग्य लेव्हल adjust करून ऐकण्यासारखे गाणे. गाणं ऐकताना शास्त्रीय संगीतावर असलेली आरडीची हुकमत आणि समज परत एकदा समोर येते. एसडी बर्मन च्या मूळ चालीला आरडी ने राग पिल...