Dombivli Fast Monologue
An excellent monologue from Madhav Apte who is anguished by the corruption and decrease in human values.
माती त्यावर शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढायची. चित्र असं होतं. मग तिथे डांबर टाकून सूरू झाले हे सर्व. हव्यास ... हव्यास जडला सर्वांना अधिक जास्तीचा हव्यास. आंगण वावर पूरेना. मग नोकरी धंदे सूरू झाले. नोकरीत पगार पूरेना धंद्यात नफ़ा पूरेना. मग तो मिळवणं सूरू झालं. पगारवाढीसाठी संप .... दमदाट्या .... मोर्चे. नफ़ा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरिमिरी, चोरी ... शेवाळं वाढतच गेलं. दलदलीत फसत गेलं सालं. छान लिहायचो चित्र काढायचो पण मग पैसे हवेत. स्थिरता म्हणून बॅंकेत. B.Com पर्यन्त एवढा शिकलो एवढं वाचलं, पण पुढे काय तर Ledger भरा परिपत्रके लिहा. जेवढा न्हायलो आधी तेवढाच कोरडा होत गेलो. थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा. एका रेशेत उभे रहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मूलं जन्माला घाला. एकेक करून अनेक गोष्टी करा आणि एकदा मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं एकटं जायचं आणि मधे हा साला जीवघेणा प्रवास....