विजय गावडेने पाठवलेली ईमेल. अतिशय सुंदर विडंबन आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन निर्णय घेणार , 'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार होणार , आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार , जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल उभारणार , काय रे देवा ! आता पुन्हा निवडणुका होणार, काळा पैसा सगळा बाहेर पडणार, यांना जिजाऊ तर त्यांना दादोजी आठवणार , मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार, बाई 'झंझावाती' रोड शो करणार, उनाड च्यानेल्स बोकाळणा...