Posts

Showing posts from November, 2009

Love

I g ot this in a forwarded email. आभाळमाया - असं असतं का प्रेम? एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. "आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' "नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' "हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' "हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.'' "अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?'' "नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले. डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, "आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर ...