Flashback
आठवतय तूला
आपली भेट झाली होती चिंब पावसाळ्यात
आणि आपण मात्र चांदण्यात तरंगत होतो
श्रावणाने त्याचे रंग विखुरले होते
ओल्या हवेत, ओले देह शहारले होते
भावनांची कविता आपण डोळ्यात वाचली होती
गंधात तुझ्या-माझ्या सारी बाग बहरली होती
आज पुन्हा फक्त एकदा तो पाउस येउ दे
थकलेले दाटलेले हे मळभ मोकळे होऊ दे
बस्स एकदा तुझी भेट व्हावी
अन श्वासांची माझ्या पूर्तता व्हावी.
Comments
Post a Comment